
ग्राहकांची खाती, वॉलेट आणि फास्टटॅगमधील जमा रकमेचा वापर केला जाईल. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवरील प्रतिबंधात्मक निर्बंधांची अंमलबजावणी 15 मार्चपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संलग्न व्यापाऱयांसह ग्राहकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. पेटीएमची सेवा पुढे सुरू ठेवण्याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला यूपीआयच्या परवानगीबाबत परीक्षण करण्यास सांगितले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला आरबीआयने पेटीएम ऍपचे यूपीआय ऑपरेशन सुरु ठेवण्यासाठी तसेच यूपीआय चॅनेलसाठी थर्ड-पार्टी ऑप्लिकेशन प्रोव्हायडर बनण्यासाठी वन 97 कम्युनिकेशन लिमिटेडच्या विनंतीचे परीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला.



























































