
मीरा, भाईंदरमध्ये भाजप आणि मिंधे गटात प्रचंड राडा सुरू आहे. भाजपचे माजी नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्या हॉटेलची तोडपह्ड मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या इशाऱयावरून झाल्याचे सांगत शेट्टी यांनी भररस्त्यात अर्धनग्न आंदोलन केले. मोदींमुळे तुम्ही ईडीतून वाचला आहात, असे ठणकावतानाच सरनाईकांना पुन्हा विधानसभेचे तिकीट दिले तर त्यांचा सुपडा साफ करू, असे आव्हानच शेट्टी यांनी दिले. दरम्यान, सरनाईकांनी शेट्टी यांच्या केलेल्या छळवणुकीविरोधात उद्या भाजप धडक मोर्चा काढणार आहे.
View this post on Instagram
अरविंद शेट्टी हे मीरा-भाईंदरमधील हॉटेल व्यावसायिक असून ते भाजपचे माजी नगरसेवक आहेत. शहरात अनेक ठिकाणी त्यांचे बार आणि रेस्टॉरंट आहेत. चेन्ना भागातही त्यांचे बीकेसी नावाचे हॉटेल आहे. याच परिसरात एमएमआरडीएच्या वतीने सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या सुशोभीकरणाच्या कामात दोन्ही बाजूंनी पत्र्याच्या भिंती उभारून बीकेसी हॉटेलची एण्ट्रीच बंद करण्यात आली. त्यातच त्यांच्या हॉटेलच्या पुढच्या काही भागाची तोडपह्ड झाली. ही तोडपह्ड सरनाईकांच्या इशाऱयावरून झाल्याचा आरोप करीत शेट्टी यांनी भररस्त्यात अर्धनग्न आंदोलन केले.
मोदीजी को मालूम पडा तो तुम्हारा दानापानी बंद होगा
सरनाईक, तुने मेरा हॉटेल तोडा है. लुट लुट के कितना लुटेगा, तुमको मेरे मोदीने ईडीसे बचाया है. अगर मोदीजी को मालूम पडा तो तुम्हारा दानापानी बंद होगा, असा इशाराच शेट्टी यांनी दिला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या आंदोलनानंतर शेट्टी यांच्यावर काशीमीरा पोलीस ठाण्यात 353 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी छळवणूक सहन करणार नाही
या घटनेचे संतप्त पडसाद मीरा, भाईंदर भाजपमध्ये उमटले आहेत. मीरा, भाईंदर भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली उद्या गुरुवारी शेट्टी यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मीरा रोड पूर्व, झंकार फॅक्ट्री येथून हा मोर्चा निघेल आणि भाजप कार्यकर्ते शेट्टी यांना छळणाऱयांविरोधात आवाज उठवतील, असा इशारा किशोर शर्मा यांनी दिला आहे.




























































