‘माझी लेखंदाजी’ पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एबीपी माझा’चे वृत्त निवेदक अश्विन बापटच्या ‘माझी लेखंदाजी’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘एबीपी नेटवर्क’चे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

अश्विन बापटने ‘एबीपी माझा’च्या वेबसाईटवर लिहिलेल्या क्रीडाविषयक लेखांचं या पुस्तकात संकलन आहे. या पुस्तकातील प्रमुख लेख गेल्या वर्षी झालेल्या वन डे वर्ल्डकपदरम्यानचे आहेत. याशिवाय ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर आणि मुपुंद कर्णिक यांना आदरांजली वाहणारे लेख तसेच सचिन तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसानिमित्ताने आणि गावसकरांच्या कसोटी पदार्पणाला पन्नाशी पूर्ण झाल्यानिमित्ताने लिहिलेले खास लेखही या पुस्तकात प्रकाशित करण्यात आले आहेत. सचिन तेंडुलकरांसह दिग्गजांनी हस्ताक्षरात दिलेले शुभेच्छा संदेश हे पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे. पुण्याच्या नावीन्य प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.