
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ शहरामध्ये रविवारी मध्यरात्री अग्नितांडव पहायला मिळाले. अप्सरा टॉकीज परिसरातील लकडगंज मार्केट रोडवरील सय्यद टाल मीलला (लाकडाची वखार) भीषण आग लागली. या आगीमुळे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
यवतमाळ शहरामध्ये रविवारी मध्यरात्री अग्नितांडव पहायला मिळाले. अप्सरा टॉकीज परिसरातील लकडगंज मार्केट रोडवरील सय्यद टाल मीलला (लाकडाची वखार) भीषण आग लागली. #yavatmal #saamanaonline pic.twitter.com/peamLyBfQ0
— Saamana (@SaamanaOnline) March 11, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोनच्या सुमारास ही आग लागली. उन्हाळ्यामुळे लाकडं वाळलेली असल्याने आग वेगाने पसरली. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचाराण केले. अग्निशमन दलाने वेळेत दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आजूबाजूची दुकाने आणि घरे वाचली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र दोन दुचाकी वाहनांसह लाखो रुपयांचे माल जळून खाक झाला.




























































