
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 12 व 13 मार्च रोजी दोन दिवसांच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघांच्या दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्या चार झंझावाती सभा होणार आहेत.
जनसंवाद यवतमाळ-वाशीम लोकसभा!
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा यवतमाळ-वाशीम लोकसभा दौरा!
दिनांक १२ आणि १३ मार्च २०२४. pic.twitter.com/RKUQwvUKQF
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 11, 2024
मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या राळेगाव व पुसद येथे सभा होणार आहेत. राळेगाव येथे दुपारी 12.30 वाजता तर पुसद येथे 5.30 वाजता सभा होणार आहेत. तर बुधवारी दुपारी 12 वाजता कारंजा येथे तर वाशीम येथे सायंकाळी सहा वाजता सभा होईल.
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारचे अक्षरशः जंगलराज सुरू आहे. लोकशाही आणि संविधान संकटात आले आहे. दिवसाढवळय़ा पक्ष चोरले जात आहेत. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी किडनॅप केले जात आहेत. गद्दार मिंधे आणि भाजपच्या गुंडगिरीविरोधात जनमानसात प्रचंड चीड आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी लढाईची हाक दिली असून ते जनतेच्या न्यायालयात उतरले आहेत.



























































