
हिंदुस्थानचा स्टार यष्ठीरक्षक ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि प्रसिध कृष्णा हे खेळणार की नाहीत याबाबत चाहत्यांना चिंता होती. मात्र आता बीसीसीआयने जारी केलेल्या हेल्थ अपडेटमध्ये ऋषभ पंत आयपीएलमध्ये भाग घेण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयपीएलसाठी ऋषभ पंत कमबॅक करणार असल्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सुखद संकेत आहेत. तर मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा आयपीएल 2024 मधून बाहेर पडले आहेत.
आयपीएल 2024 चा हंगाम 22 मार्च रोजी सुरु होणार आहे. याआधी बीसीसीआयने ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि प्रसिध कृष्णा यांच्या मेडीकल आणि फिटनेस बाबतची अपडेट जारी केली आहे. ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी उत्तराखंडच्या रुरकीजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर ऋषभ पंत हिंदुस्थानी संघ आणि क्रिकेटपासून दूर होता. आता जवळपास 14 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता ऋषभ पंत आयपीएल 2024 मध्य़े यष्ठीरक्षक फलंदाजच्या रुपात तंदुरूस्त असल्याचा घोषित केले गेले आहे. बीसीसीआयद्वारा जारी केलेली घोषणा दिल्ली कॅपिटल्ससाठी सुखद संकेत आहेत. ऋषभ पंत याने आयपीएलमध्ये 98 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2838 धावा केल्या आहेत. तर पंतने 33 कसोटी सामन्यांमध्ये 2271 धावा केल्या आहेत. तर 30 वनडे सामन्यांमध्ये 865 धावा केल्या आहेत. 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 987 धावा केल्या.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळलेला प्रसिध कृष्णा आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने प्रसादच्या वैद्यकीय बुलेटिनबद्दल माहिती दिली की, वेगवान गोलंदाजाने 23 फेब्रुवारी 2024 रोजी लेफ्ट प्रॉक्सिमल क्वाड्रिसेप्स टेंडनसाठी शस्त्रक्रिया केली. सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली प्रसिध लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू करेल. तो आयपीएल 2024 मध्ये भाग घेऊ शकणार नाही. 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला 10 कोटी रुपयांना विकत घेतले. मोहम्मद शमी याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांची 26 फेब्रुवारी 2024 रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सध्या बीसीसीआयची मेडिकल टीम त्याची देखरेख करत असून शमीही आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

























































