
उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील एका टेकडीवर अवैध उत्खननादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. बेकायदा उत्खननासाठी करण्यात येत असलेल्या स्फोटादरम्यान हा अपघात घडला. स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला, तर 8 मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त केली आहे. ही संपूर्ण घटना कबराई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहारा गावाजवळ घडली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू केले आहे.
घटनास्थळावर उपस्थित लोकांनी सांगितले की, ही घटना महोबाच्या करबई परिसरातील पहरा गावाजवळील टेकडीवर घडली आहे. या टेकडीवर अवैध उत्खननासाठी स्फोट केले दातात. मंगळवारी 12 मार्च रोजी उत्थननासाठी केला गेलेला स्फोट इतका भयंकर होता की, त्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 मजूर आत अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलीस जखमी मजूरांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात आहे. सध्या घटनास्थळी पोलीस प्रशासनाचे पथक बचावकार्य करत आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अपघाताची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला वेगाने करण्याचे निर्देश दिले. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत.




























































