
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात गर्भगृहाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन येत्या 15 मार्चपासून बंद करण्यात येणार आहे. पुढील तीन महिने भाविकांना 30 फुटांवरून मुखदर्शन करता येईल. तेही सकाळी 6 ते 11 या वेळेत. इतर वेळी दर्शन बंद असेल. मात्र बाहेरील स्क्रीनवर देवाचे दर्शन घेता येईल. विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीपूर्वी गाभाऱयातील सर्व कामे पूर्ण होतील, असे मंदिर समितीने सांगितले आहे.

























































