
यंदा निवडणुकीचा तिकीट मला जरी मिळाला असलं तरी गेला पाच वर्षाचा काळ हा खडतर काळ होता, कोणाच्या या पाच वर्षांमध्ये भावना दुखवल्या असतील तर मी माफी मागतो असे म्हणत भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी आज भाजपाच्या बैठकीमध्ये तीन वेळेला पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची माफी मागितली. तर दुसरीकडे या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व लोकसभेचे समन्वयक भानुदास बेरड यांनी या सभेकडे पाठ फिरवली. भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी अवघे दीड मिनिट भाषण करून विखेना पाठिंबा दिला.
भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची पूर्वतयारीची आढावा बैठक आज नगर येथे पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक विजय चौधरी, आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले ,भाजपाचे उमेदवार सुजय विखे ,अभय आगरकर यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीने आज नगर येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला आमदार राम शिंदे उपस्थित राहतील का नाही अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. पण शिंदे हे या बैठकीला उपस्थित राहिले पण दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही तर विशेष म्हणजे भाजपाच्या निवडणुकीच्या इच्छुक यादीमध्ये आमदार राम शिंदे व प्रदेश कार्यकारणी सदस्य भानुदास बेरड हे सुद्धा इच्छुक होते मात्र पक्षाने त्यांना लोकसभेचे समन्वय अशी नियुक्ती अगोदरच केल्यामुळे आज त्यांनी ज्या बैठकीलाच दांडी मारली त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. तर या बैठकीमध्ये आमदार राम शिंदे यांनी भाषण करताना अवघे दीड मिनिटे भाषण केले व मी सुद्धा खासदारकीच्या तिकिटासाठी इच्छुक होतो पण पक्षाने सुजय विखे यांना उमेदवारी दिली ती उमेदवारी मी मान्य करतो असे म्हणत आपण त्यांना पाठिंबा देत आहोत असे त्यांनी आपल्या भाषणातून जाहीरपणे सांगितले व त्यांनी अवघ्या दीड मिनिटांमध्ये आपले भाषण आटोपते घेतले.
खा. विखे म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मला पुन्हा संधी मिळाली आहे. माझे भाषण कोणाच्या विरोधात नाही. पाच वर्षाचा प्रवास घट्ट राहिला आहे.पाच वर्षात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. अबकी बार चारसौ पारचा नारा देण्यात आलेला आहे. तेवढे खासदार निवडून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असल्याने मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. माझ्याकडून नेते आणि कार्यकर्त्यांबाबत नाराजी झाली असेल तर मी माफी मागतो, असे म्हणून खा. सुजय विखे यांनी आपल्या भाषणात तीन वेळा माफी मागितली.

























































