धक्कादायक! हिंदुस्थान जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थानातील वायू प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार हिंदुस्थान हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदुषित देश असल्याचे समोर आले आहे. IQR या स्वित्झरर्लंडमधील संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हिंदुस्थान सोबत या यादित पहिल्या क्रमांकावर बांगलादेश व दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे.

या संस्थेच्या ‘जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2023’ या मध्ये 134 देशांची यादी आहे. यात हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. तर शहरांनुसारच्या यादीत हिंदुस्थानातील बेगुसराय हे शहर जगातील प्रथम क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. 2022 मध्ये हिंदुस्थान हा जगातील आठवा सर्वाधिक प्रदूषित देश होता.

2023 मधील जगातील सर्वाधिक प्रदूषित पाच देश

बांगलादेश
पाकिस्तान
हिंदुस्थान
ताजिकिस्तान
बुर्किनो फासो