ऐन निवडणुकीत रस्ते योजनांसाठी बोली, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. तरीही मिंधे सरकारच्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) रस्ते योजनांसाठी बोली लावून आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी धोरणे व प्रकल्प जाहीर करणे हे मतदारांवर प्रभाव टाकणारे असून त्यातून सत्ताधारी पक्षाला लाभ मिळू शकतो. एमएसआयडीसी रस्ते बांधकामाची विशिष्ट कामे करत आहे आणि त्यांनी या कामासाठी विविध बोलीदारांकडून बोली आमंत्रित केली आहे. महामंडळाची ही कृती सत्ताधारी पक्षांना फायदा पोहचवणारी असून महामंडळ आपल्या पदाचा गैरवापर करत आहे, त्यामुळे एमएसआयडीसीने लावलेली बोली रद्द करावी, असेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली.