
बंगळुरू येथील शास्त्रज्ञांनी मेंदूप्रमाणे काम करणारी एक चिप तयार केलीय. या चिपमुळे एआय क्रांती होईल. विशिष्ट पद्धतीच्या या चिपमध्ये सर्व डेटा 16500 पद्धतीने स्टोअर करू शकतो, हे याचे खास वैशिष्टय़ आहे. बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या (आयआयएससी) शास्त्रज्ञांनी हा शोध लावला असून ‘नेचर’ या जगप्रसिद्ध सायन्स जर्नलमध्ये त्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. श्रीतोष गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली या चिपचे संशोधन झाले.
– या तंत्रामुळे कॉम्प्युटरचे काम करण्याचे तंत्र पूर्णपणे बदलेल. याला न्यूरोमार्ंफग का@म्प्युटिंग म्हणतात. आताचे कॉम्प्युटर हे प्रोग्रॅमिंगच्या हिशेबाने काम करतात. मात्र ही चिप एखाद्या मेंदूप्रमाणे काम करेल. श्रीतोष गोस्वामी म्हणाले, न्यूरोमार्ंफग कॉम्प्युटिंगमध्ये मागील 10 वर्षांपासून अनेक आव्हाने येत आहेत. आता पुठे यश मिळत आहेत. या संशोधनातून आम्ही एक आदर्श प्रणाली साकारलेय.
– चीपचे संशोधन एआय क्षेत्रात क्रांती घडवेल. यामुळे वीज कमी लागेल. हार्डवेयरचा वापरही जास्त होणार नाही. डेटा स्टोर आणि प्रोसेसिंगसाठी ही चीप एखाद्या मेंदूप्रमाणे काम करेल. ही एकप्रकारे मॉलिक्युलर डायरी आहे, जी कॉम्प्युटिंगप्रमाणे काम करेल.
























































