दिल्लीत पदयात्रेत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेदरम्यान हल्ला झाल्याची घटना आज घडली. ‘आप’ने या हल्ल्यासाठी भाजपला जबाबदार धरले असून त्यांनी पाठवलेल्या गुंडांनी केजरीवाल यांच्यावर हा भ्याड हल्ला केल्याचा आरोप केला आहे. पश्चिम दिल्लीतील विकासपुरी येथे ही घटना घडली.  केजरीवाल यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय आणि अत्यंत चिंताजनक आहे. भाजपनेच गुंड पाठवून हा हल्ला केल्याचे साफ दिसत आहे, अशी प्रतिक्रिया ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. उद्या जर केजरीवाल यांना काही झाले तर त्यासाठी भाजपच जबाबदार राहील, असा इशाराही सिसोदिया यांनी दिला आहे.