एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना झटका, ईएमआय वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

एचडीएफसी बँकेने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने एमसीएलआर 0.05 टक्के वाढवला आहे. नवीन दर 7 डिसेंबर 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय आता वाढणार आहे. एचडीएफसी बँकेने ओव्हरनाईट पीरियडवरील एमसीएलआर 9.15 टक्क्यांच्या ऐवजी आता 9.20 टक्के केला आहे. यामुळे ग्राहकांचे गृहकर्ज, पर्सनल लोन, ऑटो लोनसह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग कर्जाचा ईएमआय वाढणार आहे.