
नववर्षानिमित्त अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गाणगापूरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर मैंदर्गीजवळ काळाने घाला घातला. स्कॉर्पिओ आणि आयशर टेम्पो यांच्या भीषण अपघातात चार भाविक ठार झाले असून, 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका मुलीसह महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, हे भाविक नांदेड जिह्यातील आहेत. वैष्णवी हणमंत पाशावर, सागराबाई गंगाधर कर्णपल्ली, गंगाधर कर्णपल्ली, हणमंत गंगाराम पाशावर अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.