
आपण शांततेबद्दल बोलतो तेव्हा जग आपले ऐकते, कारण हिंदुस्थान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी आहे; पण पाकिस्तानला शांतता नाही, तर प्रॉक्सी वॉर हवे आहे. मी माझ्या शपथविधीला नवाज शरीफ यांना आमंत्रित केले होते. आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले. परंतु, हिंदुस्थानचा नेहमीच पाकिस्तानकडून विश्वासघात झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 2002 च्या गुजरात दंगलीबद्दल विचारले असता, गुजरात दंगलीच्या चर्चेतून खोटी कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असे मोदी म्हणाले.
            
		





































    
    



















