शिवनेरीवर मधमाशांच्या हल्ल्यात 20 पर्यटक जखमी

आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक शिवभक्त तसेच पर्यटकांनी मोठ्या संख्येने किल्ले शिवनेरीवर गर्दी केली होती. त्याचवेळी शिवाई देवी मंदिर परिसरात कडक उन्हामुळे आग्यामोहोळातील माशांनी या पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये 20 जण जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी सवा नऊच्या दरम्यान घडली. सर्व जखमींना सुखरूप खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आल्याचे रेस्क्यू टीमने सांगितले.