मोदींच्या घरी 24 तासात दोन उच्चस्तरीय बैठका

दहशतवादाला चिरडून टाकणे हा राष्ट्रीच संकल्प असून टार्गेट, टाईम आणि हल्ला कशाप्रकारे करायचा हे लष्कराने ठरवावे, त्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुखांच्या बैठकीत मांडली. त्यानंतर आज 24 तासात पंतप्रधानांच्या निवासस्थानी दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रणनीति ठरवण्यासाठी बैठकांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. बैठकीला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी उपस्थित होते. बैठक सुमारे 90 मिनीटे चालली.