
25 लाखांच्या मोबदल्यात 50 लाखांच्या चलनी नोटा देऊ अशी बतावणी करीत दोघा व्यावसायिक भागीदारांना एका टोळीने गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. चेंबूर येथे पैसे घेऊन बोलावल्यानंतर त्या ठिकाणी तोतया पोलिसांनी रेड टाकून व्यावसायिकांचे 25 लाख रुपये फिल्मीस्टाइलने लुटून नेले. याप्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियल इस्टेटचा व्यवसाय करणारे संतोष खांबे आणि त्यांचा व्यावसायिक भागीदार अमित कारंडे यांची लुबाडणूक झाली आहे. अमित यांनी त्यांचा ओळखीचा प्रवीण मुंगसे हा 25 लाख रुपयांच्या मोबदल्यात 50 लाख रुपये तेही चलनी नोटा देईल असे सांगितले. त्यानुसार दोघांनी मिळून हा सौदा करायचे ठरवले होते.