स्टेटसवर ‘समाप्त’ शब्द टाकून तरुणाची आत्महत्या

साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना वैजापूर शहरातील कुंभारगल्ली भागात शनिवारी दुपारी एक वाजता घडली. महेश पुरूषोत्तम धारुरकर (34) असे या घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे.

आर्थिक विवंचनेतून त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तो आई वडिलांना एकुलता मुलगा होता. त्याच्या पश्चात वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. शनिवारी मोबाईल स्टेटसवर ‘समाप्त’ शब्द टाकून त्याने जीवन संपवले. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार भगवान सिंगल हे करीत आहेत.