
हिंदुस्थान पाकिस्तान सीमेवर हिंदुस्थानी सैनिकांनी एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे. नुकतंच जम्मू कश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे.
राजस्थानमध्ये सीमेवर हिंदुस्थानी सैनिकांनी एका पाकिस्तानी रेंजरल ताब्यात घेतले आहे. राजस्थान फ्रंटियरने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉला ताब्यात घेतले आहे. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानला विरोध करूनही पाकिस्तानने शॉ यांना सोडलेले नाही. शॉ चूकून पाकिस्तानी हद्दीत गेले होते.
या पूर्वी एखादा सैनिक सीमेपार गेला तर त्यावर तोडगा काढला जात होता. पण आता पहलगाम घटनेमुळे सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी सैन्य बीएसफ जवानाबद्दल कुठलीच माहिती देण्यास तयार नाही.
हिंदुस्थान आणि पाकिस्तानदरम्यान 4-5 बैठका झाल्या आहेत, पण बीएसएफ जवानाच्या परतण्याबाबत कुठलाच अंतिम निर्णय झालेला नाही. पाकिस्तानी सैन्याने बीएसएफ जवान शॉ यांना लाहोर अमृतस भागात आणलं आहे आणि लवकरच त्यांना हिंदुस्थानकडे सोपललं जाईल. पण यावर पाकिस्तानकडून काहीच माहिती दिली जात नाहिये.