
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांचा सॅनफ्रान्सिस्को येथे स्टेट ऑफ कॅलिफोर्निया, द काऊंटी ऑफ सॅंटा क्लारा ह्यूमन रिलेशन कमिशन यांच्यातर्फे ‘आउटस्टँडिंग इन्वॅल्युएबल सर्विस’ हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मागील सहा वर्षांपासून सॅनफ्रान्सिस्को येथे रेस्टॉरंट चालवत असलेल्या विष्णू मनोहर यांनी दिलेल्या सामाजिक योगदानासाठी त्यांना कमिशनचे आयुक्त नरेंद्र पाठक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्विकारताना विष्णूजी म्हणाले, ‘परदेशातील लोकांमध्ये मराठी खाद्यसंस्कृतीची प्रचार व प्रसार करण्यासोबतच तेथील लोकांना वेळोवेळी मदत केली. या कार्याचा हा सन्मान असून याचे संपूर्ण श्रेय युएसए टीम आणि तुषार कोठलकर्जी, नारेश कूमार, समीर पाटील, हेमंत कुलकर्णी, विनोद पाताडे यांना देतो.’
इतिहासात पहिल्यांदा हॅरिसन सिटी काउंटी मधे कलेक्टर Annette Ramirez यांच्या शपथग्रहण समारंभाला मराठी शाकाहारी जेवण ठेवण्यात आले होते. यात श्रीखंड पुरी, मसालेभात, बटाटा वडा, इत्यादी पदार्थ देण्यात आले होते.