
प्रेमप्रकरणातून प्रेयसीने साथीदारांच्या मदतीने तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी अशोक मधे याचा मृतदेह उंबरखांड गावाजवळील महामार्गावर फेकला. पोलिसांनी तपास सुरू करून तिघांच्या मुसक्या आवळल्या.
शीतल फोडसे, वसीम पठाण, राहुल गुंजाळ अशी अटक आरोपींची नावे आहेत. रील स्टार महिला शीतल फोडसे आणि अशोक मधे हे एक वर्षापासून एकत्र राहत होते. या महिलेचे वसीम पठाण याच्यासोबतही प्रेमप्रकरण सुरू होते. हे अशोकला समजताच तो आपल्याला मारेल या भीतीने महिलेने तिच्या प्रियकरासह अशोकचा काटा काढायचा प्लॅन आखला.