
एक पाकिस्तानी नागरिक पंजाबमधून बेकायदेशीरपणे हिंदुस्थानात घुसखोरी करत होता. तेव्हा बीएसएफने या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. हिंदुस्थानने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसाही रद्द केला होता. आता बीएसएफने एका पाकिस्तानी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. हा पाकिस्तानी पंजाबमधील सीमेवरून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता. या व्यक्तीचे नाव मुहम्मद हुसेन असून त्याच्याकडून पाकिस्तानी ओळखपत्र आणि पाकिस्तानी चलन जप्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी सैन्याने एका पाकिस्तानी रेंजरला राजस्थानात अटक केली होती. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.