
मुंबई महापालिका आयुक्तांनी 31 मेपूर्वी पावसाळय़ापूर्वीची नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिले असताना मुंबईची नालेसफाई मात्र कासवगतीने सुरू आहे. पुठे 10 टक्के तर पुठे 20 टक्के, काही ठिकाणी तर काही ठिकाणी नालेसफाई केल्याची पह्टोग्राफी, व्हिडीओग्राफीचे पुरावेच पालिका अधिकाऱयांना देता आले नाही. त्यामुळे पश्चिम उपनगरातील नालेसफाई पाहणी दौऱयानंतर मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्र्यांनी पालिका अधिकाऱयांपुढे हात जोडले.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज मुंबई पश्चिम उपनगरातील नालेसफाईचा पाहणी दौरा केला. सांताक्रुझ पश्चिम येथील गझदरबांध येथून या दौऱयाला सुरुवात केली. यावेळी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातील अधिकारीही उपस्थित होते. गझदरबांधनंतर एसएनडीटी नाला, इर्ला नाला, मोगरा नाला, शहीद भगत सिंगनगर नाल्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली.
पुरावे केवळ केवळ कागदावर
नालेसफाईचे व्हिडीओ शूटिंग आणि पह्टोग्राफी होते असे पालिका अधिकाऱयाने सांगितल्यावर मिलेनियम नाला येथे संबंधित अधिकारी वर्ग नाल्यातील गाळ काढल्यावर भरतानाचा आणि नंतर भरलेल्या डंपरचा तसेच रिकाम्या होणाऱया डंपरचा व्हिडीओ उपलब्ध करू शकले नाहीत. त्यामुळे नालेसफाईची आतापर्यंत किती व्हिडीओग्राफी झाली, तंत्रज्ञानाचा वापर पुठे आणि कसा झाला, याची माहिती पर्जन्य जलवाहिनी खात्याचे अधिकारी देऊ शकले नाहीत.
नालेसफाईचे अॅप अपडेट नाही
मुंबईच्या नालेसफाईची माहिती पालिकेच्या अॅपवर दिली जाते. त्यामुळे भाजप शिष्टमंडळाने याची माहिती मागितली. ही माहिती अॅपवर दाखवण्याचा प्रयत्न पालिका अधिकाऱयांनी केला, मात्र ही माहितीही अपडेट नसल्याचे आढळले.
आता पालिका आयुक्तांनीच रस्त्यावर उतरून पाहणी करावी!’
पंत्राटदारांकडून नालेसफाईची कामे वेळेत करून घेणे आवश्यक आहे. पंत्राटदारांना पाठीशी घालू नका. नालेसफाई पुठेच नीटपणे झालेली नाही. नालेसफाईच्या डेडलाईनला आता केवळ 23 दिवस शिल्लक उरले आहेत. नालेसफाईची चित्र धक्कादायक आहे. सगळा कारभार बेभरवशाचा आहे. पालिका आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरावे आणि नालेसफाईच्या कामाची पाहणी करावी, असे आव्हान भाजप शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले आहे.




























































