चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग

पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणीवाटप करार स्थगित केल्यानंतर हिंदुस्थानने चिनाब नदीवरील चार जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग दिला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 1960 च्या सिंधू जल कराराला स्थगिती देत हिंदुस्थानने पाकिस्तानचे पाणी तोडले. कराराला एकतर्फी स्थगिती देत आता हिंदुस्थानने जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग दिला आहे. सरकारने 3,014 मेगावॅट क्षमतेच्या चार जलविद्युत प्रकल्पांच्या जलद बांधकामातील अडथळे दूर करण्याचे आदेश अधिकाऱयांना दिले आहेत. या कामांना पाकिस्तानचा विरोध आहे.

हे ते चार प्रकल्प
पाकल दुल (1,000 मेगावॅट), किरू (624 मेगावॅट), क्वार (540 मेगावॅट) आणि रतले (850 मेगावॅट). हे प्रकल्प चिनाब नदीवर आहेत.