
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने 7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्तान व पीओकेमध्ये 100 किलोमीटर आत घुसून 9 दहशतवादी तळ बेचिराख केले होते. हिंदुस्थानच्या या हल्ल्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. यात हिंदुस्थानच्या मोस्ट वॉन्टेड ‘टॉप-5’ दहशतवाद्यांचाही खात्मा झाल्याचे उघड झाले आहे. या दहशतवाद्यांची नावे आता समोर आली असून यामध्ये मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु जुंदाल याचाही समावेश आहे.
हिंदुस्थानने 7 मे रोजी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये पाकिस्तानमध्ये लपून बसलेले अनेक मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ठार झाले. लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाच बड्या दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात हिंदुस्थानला यश आले आहे. यात मसूद अझहरचा भाऊ आणि दोन मेहुण्यांचाही समावेश आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैन्याकडून मानवंदनाही देण्यात आली होती. अबू जुंदाल याच्या अंत्यविधीला पाकिस्तानचे सैन्य अधिकारीही उपस्थित होते.
1. मुदस्सर खादियान खास ऊर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल
लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबू जुंदाल हा मुरिदकेचा प्रभारी होता. पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी त्याच्या अंत्यविधीला उपस्थित होते. त्याला गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आले होते. पाकिस्तानी सैन्यप्रमुख आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या वतीने त्याला पुष्पहारही अर्पण करण्यात आला होता. जमात-उल-दावाचा दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ याच्या नेतृत्वात सरकारी शाळेमध्ये अबू जुंदालसाठी अंत्यप्रार्थना घेण्यात आली होती. यात पाकिस्तान सैन्याचे लफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजीही उपस्थित होते.
मसूदचा भाऊ रौफ अजगरचा खात्मा, जनाज्यात पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी
2. हाफिज मोहम्मद जमील
जैश प्रमुख मौलाना मसूद अझहर याचा मोठा मेहुणा असलेला हाफिज मोहम्मद जमिल बहावलपूरमधील ‘मरकझ सुभान अल्लाह’चा प्रमुख होता. तरुणांना कट्टरपंथी बनवणे आणि जैशसाठी निधी गोळा करण्यात त्याचा सक्रियपणे सहभाग होता.
3. मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब
जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा हा मेहुणा होता. जैशच्या दहशतवाद्यांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण तो देत होता. जम्मू-कश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ले याने घडवून आणले होते. कंदहार विमान (आयसी-814) अपहरण प्रकरणात हा मोस्ट वॉन्टेड होता.
4. खालिद उर्फ अबू अकाशा
जम्मू-कश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सक्रिय असलेला खालिद लश्कर-ए-तोयबाचा सदस्य होता. अफगाणिस्तानमधून शस्त्रास्त्रांची तस्करीमध्ये तो सहभागी होता. त्याच्या फैसलाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यात पाकिस्तानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्तही सहभागी झाले होते.
5. मोहम्मद हसन खान
पीओकमधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खानचा हा मुलगा होता. जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांवेळी समन्वयाकाची भूमिका त्याने बजावली होती.
#BreakingNews | Details of terrorists killed in the Indian strikes on 7May in Pakistan
1. Mudassar Khadian Khas @ Mudassar @ Abu Jundal
Affiliation: Lashkar-e-Taiba
•In-charge of Markaz Taiba, Muridke.
•Received a guard of honour at his funeral by the Pakistan Army.
•Wreaths… pic.twitter.com/IbnOgZJUP6— DD News (@DDNewslive) May 10, 2025