नियंत्रण रेषा आणि सीमावर्ती भागात पहिली शांततेची रात्र, हिंदुस्थानी सैन्याकडून माहिती

गेल्या चार दिवसांपासून हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात  अनेक जोरदार गोळीबार सुरु होता. जोरदार गोळीबारानंतर शस्त्रसंधी दर्शविल्यानंतर जम्मू आणि कश्मीर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात रात्रीची शांतता पाहायला मिळाली. हिंदुस्थान आणि पाकिस्तानने शस्त्रंसधीवर सहमती दर्शविल्यानंतर, आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात रात्रीला मोठ्या प्रमाणात शांतता होती.

गेल्या महिन्यात जम्मू आणि कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये चार दिवसांपासून जोरदार गोळीबार सुरू होता. शनिवारी संध्याकाळी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीवर सहमती दर्शविली. आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात रात्र मोठ्या प्रमाणात शांततापूर्ण राहिली. त्यामुळे कोणत्याही घटनेची नोंद झालेली नाही,” असे लष्करी सूत्रांनी माध्यमांना सांगितले.

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमीन, हवाई आणि जल अशा सर्व स्तरावरुन गोळीबार आणि लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्याचा करार केला. परंतु अवघ्या काही तासांनंतर, श्रीनगर आणि गुजरातच्या काही भागांसह जम्मू आणि कश्मीरमधील विविध ठिकाणी ड्रोन दिसले आणि त्यांना रोखण्यात आले. या घडलेल्या घटनेवर हिंदुस्थानने रात्री उशिरा पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे आणि त्याचे सशस्त्र दल योग्य प्रत्युत्तर देत आहेत.

सशस्त्र दल याला चोख प्रत्युत्तर देत आहेत आणि आम्ही या उल्लंघनांची अतिशय गंभीर दखल घेतो,” असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी रात्री 11.20 वाजता पत्रकारांना संबोधित करताना सांगितले. त्यांनी पाकिस्तानला उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आणि परिस्थितीला गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळण्याचे आवाहन केले. सशस्त्र दल परिस्थितीवर कडक नजर ठेवून आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर उल्लंघनाची पुनरावृत्ती झाल्यास त्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे मिस्री म्हणाले.