
मे महिन्यात खरंतर पावसाळापूर्वीची कामे सुरू असतात. मात्र नाशिक येथे यंदा आठवडाभरापासून पाऊस न चुकता रोज हजेरी लावत आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे लटकली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नाशिकमध्ये सध्या काही भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत तर कुठे गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. अशातच दररोज पावसाची हजेरी लागत असल्याने शहरात बऱ्याच भागात पाणी साचणे, रस्ते चिखालाचे झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
तसेच वादळीवाऱ्यांमुळे झाडे, झाड्यांच्या फाद्या पडून रस्ते वाहतुकीला अडथळे होत असून शहराची वाहतूक मंदावत आहे. तर वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागात वीजपुरवठा देखील खंडित झाल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
पाणी साठणे, झाडे पडणे, वाहतूक मंदावणे, वीज पुरवठा खंडित होणे या सततच्या घटनांमुळे शहर तसेच जिल्ह्यातील उद्योग, शेती, व्यापार आणि जनजीवन साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा, 50-60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता