दादरमधील स्थानिकांना सवलतीच्या दरात पार्किंग द्या! शिवसेनेची महापालिकेकडे मागणी

मुंबई महापालिकेच्या वतीने दादरच्या कोहिनूर स्क्वेअर या इमारतीत सर्वांसाठी पार्किंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे. स्थानिकांना या ठिकाणी सवलतीच्या दरात पार्किंग उपलब्ध करून दिली जात होती, मात्र आता ही सवलत काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांना आधीप्रमाणेच सवलतीच्या दरात पार्किंग द्या, अशी मागणी शिवसेनेने महापालिकेकडे केली आहे.

दादरमधील रहिवाशांना त्यांच्या गाड्या पार्किंग करण्यासाठी कोहिनूर स्क्वेअर इमारतीच्या पार्किंगमध्ये मुंबई महापालिकेने वाहनतळ उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी महिना 4 हजार 400 शुल्क आकारले जाते. शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत यांनी महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करून ते शुल्क 1 हजार 50 रुपये करून घेतले होते. परंतु आता त्याच पार्किंगसाठी 3 हजार 80 रुपये भरावे लागत आहेत. याबाबत वरळी हब उपप्रमुख अभियंता वाहतूक महेंद्र अग्रवाल यांना माजी शाखाप्रमुख चंद्रकांत झगडे, महाराष्ट्र वितरक सेनेचे संतोष देवरुखकर, उपशाखाप्रमुख संदीप (आप्पा) पाटील, अजय काwसाले यांनी भेट घेऊन स्थानिकांसाठी पार्किंग शुल्क पूर्ववत 1 हजार 50 रुपये करण्याची मागणी केली.