
परळच्या आर.एम.भट हायस्कूलमध्ये सातवीमधील चैतन्य घुले (12) याला कानातील दोषांमुळे ऐकू येत नाही. यामुळे त्याच्या बोलण्यातही अडचणी निर्माण होतात. आर्थिक स्थिती बेताची असलेल्या त्याच्या पालकांनी अथक प्रयत्न करून 2018 मध्ये त्याच्यावर ‘बीएएमए’ शस्त्रक्रिया करून घेतली. ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरली, मात्र कालांतराने या सर्जरीमधून बसवलेला प्रोसेसर बंद पडला आहे. हा प्रोसेसर पुन्हा बसवण्यासाठी त्याला तब्बल 14 लाख 20 हजारांचा खर्च येणार आहे. त्यासाठी आर. एम. भट शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या गुरुदक्षिणा संघाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थी संघाच्या QR code वर तुम्ही मदत पाठवू शकता. मदत पाठवताना मेसेजमध्ये “Navchaitanya” लिहा. UPI पेमेंटचा स्क्रीन शॉट तुमच्या PAN क्रमांकासह अमित ढोलम (खजिनदार) 9322254465 यांना पाठवा.