
मुंबई शहरातील 70 हून अधिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आज घाऊक बदल्या करण्यात आल्या. काही निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून पोलीस ठाण्यात प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.
देवेन भारती यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज आयुक्तालयातील 70 हून अधिक वरिष्ठ निरीक्षकांना नवीन जबाबदारी देण्यात आली. काहींची इतरत्र बदली केली तर बऱ्याच निरीक्षकांना वरिष्ठ निरीक्षक बनवून त्यांना पोलीस ठाणे तसेच अन्य विभागात नियुक्त करण्यात आले.