एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय, हिंदुस्थानने किती विमाने गमावली? राहुल गांधींचा पुन्हा केंद्र सरकारला सवाल

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच ऑपरेश सिंदूरमध्ये हिंदुस्थानने किती विमाने गमावलीत, हा सवाल राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा X वर एक पोस्ट करत विचारला आहे.

आपल्या क्स पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले आहेत की, “परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर एस. जयशंकर यांचं मौन निंदनीय. पाकला अधीच अलर्ट केल्यामुळे आपण किती हिंदुस्थानी विमानं गमावली, हे मी पुन्हा विचारतो. ही चूक नव्हती. हा गुन्हा होता आणि सत्य देशाला कळायला हवं.” दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या लपवाछपवीमुळे मोदी सरकारच्या अडचणींत वाढ होत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे केंद्र सरकारची दमछाक उडण्याची शक्यता आहे.

याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, “जयशंकर यांच्या विधानाची पाकिस्तानात चर्चा सुरू आहे. आपल्या देशाची चेष्टा केली जात आहे. जगभरात आपली थट्टा केली जात आहे. म्हणूनच राहुल गांधी हा प्रश्न विचारत आहेत. तुम्ही विचार करत आहात की, विरोधी पक्ष संवेदनशील प्रश्नांवर गप्प राहतील, पण आम्ही प्रश्न विचारू. अन्यथा पुलवामा आणि पहलगाम सारख्या घटना घडत राहतील.”