
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी तेहरानमधील अणु कार्यक्रमासाठी अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही असे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने इराणच्या अणु कार्यक्रम आणि समृद्ध युरेनियमप्रकरणी केलेली टीका वेडेपणा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. समृद्ध युरेनियमसाठी इराणला परवानगी देणार नाही. इराणमध्ये आमच्या परवानगीची कुणीच वाट बघत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. परंतु, इस्लामिक गणराज्याची स्वतःची ध्येय आणि धोरणे असून आम्ही त्यावर ठाम आहोत असेही खामेनी म्हणाले. गेल्या वर्षी हॅलिकॉप्टर अपघातात मरण पावलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात खामेनी बोलत होते. चर्चेतून काहीही निष्पन्न होत नाही. आम्हालाही त्यांच्याकडून फार काही अपेक्षा नाही. पुढे काय होईल कुणाला माहीत, असेही खामेनी म्हणाले.
n अण्वस्त्रांसाठी 90 टक्के शुद्धतेपर्यंत समृद्ध केलेले युरेनियम आवश्यक असते. परंतु, इराणला केवळ 300 किलो समृद्ध युरेनियम ठेवण्याची परवानगी होती. इतका समृद्ध युरेनियम नागरी अणुउर्जा आणि संशोधन उद्देशांसाठी पुरेसे होतो, अशी अमेरिकेची भूमिका आहे.