
वेबसाईट डिझायनर असूनही हवा तसा जॉब मिळत नसल्याने त्याने नको तो मार्ग निवडला. त्या मॅट्रीमोनियल संकेतस्थळावर जाऊन विवाहासाठी वर शोधत असलेल्या घटस्पह्टीत महिलांना टार्गेट केले. दुसरे लग्न करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना हेरून त्यांना तो आर्थिक गंडा घालू लागला. अशा प्रकारे त्याने शेकडो घटस्फोटीत महिलांना फसवले. अखेर एलटी मार्ग पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
शिवम श्रीवास्तव असे त्या आरोपीचे नाव आहे. शिवम वेबसाईट डिझायनर आहे. काही कारणास्तव त्याला नवनवीन जॉब मिळणे बंद झाले. त्यामुळे त्याच्यावर झोमॅटोचे काम करायची वेळ आली. दरम्यान त्याने मॅट्रोमोनियल संकेतस्थळावर जाऊन दुसरे लग्न करण्यास इच्छुक असलेल्या महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. तो संकेतस्थळावरील महिलेला संपर्क साधून लग्न करण्यास पसंती दाखवू लागला. महिलेनेदेखील पसंती दाखविल्यावर तो वेगवेगळी कारणे सांगून पैसे मागायचा. पैसे मिळाले की तो नंबर ब्लॉक करायचा. गिरगावात राहणाऱ्या एका घटस्पह्टीत महिलेला त्याने चार वर्षांत आठ लाखांचा गंडा घातला होता. याप्रकरणी तिने तक्रार दिल्यानंतर एल. टी. मार्ग पोलिसांनी तपास करून लखनौहून शिवम श्रीवास्तव या तरुणाला उचलले.
शिवमने त्याचा स्वतः मोबाईल यासाठी वापर होता. शिवाय स्वतः बँक खात्यावर पैसे घ्यायचा. त्यामुळे त्याला पकडणे सहज शक्य झाले. त्याच्या मोबाईलमध्ये 700 नंबर ब्लॉक असल्याचे आढळून आले असून त्याने 100 हून अधिक महिलांची लग्न करायचे आश्वासन देऊन फसवणूक केली असणार असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तो वरुण किंवा विनिता मल्होत्रा हे नाव वापरायचा.