
इमारतीच्या टेरेसवरून सूर्यास्ताचा फोटो काढणे अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतले. आठव्या मजल्यावरून पडल्याने मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
मृत मुलगी ही दहिसर पूर्व परिसरात एका सोसायटीत राहत होती. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. ती आठव्या मजल्यावर टेरेसवर फोटो काढण्याची परवानगी मागण्यासाठी गेली. काही मिनिटाने ती मुलगी आठव्या मजल्यावरून पडून जखमी झाल्याची माहिती रहिवाशांनी तिच्या वडिलांना दिली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.