कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

काल मुंबईसह राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाने नगर, बीड, धाराशीव, बुलढाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील असेही हवामान विभागाने म्हटले आहे.