
राज्यात कायदा सुवव्यस्थेचा बोजवारा उडाला आहे ही बाब अधोरेखित करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. टेंभी नाक्यावरच मिंधे गटावर हल्ला करण्याचा प्रयत्न
झाला आहे.
टेंभी नाक्यावर मिंधे गटाच्या माजी नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. टेंभी नाक्यावर एका अज्ञात व्यक्तीने मिंधे गटाच्या माजी नगरसेवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून ठाणे नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.