हिंदुस्थानची दहशत; पाकिस्तानी हवाई क्षेत्र आणखी महिनाभर बंद

पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या तडाख्याने बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानी  लष्कराचे तळ आणि नागरी वस्त्यांवर हल्ले केले. हे सर्व हल्ले हिंदुस्थानी लष्कराने परतवून लावले. त्यानंतर पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र हिंदुस्थानच्या विमान पंपन्यांसाठी बंद ठेवले. 23 मेपर्यंत ही बंदी होती, परंतु हिंदुस्थानच्या धसक्याने पाकिस्तानने ही बंदी आणखी महिनाभरासाठी वाढवली आहे. 

पाकिस्तानने यापूर्वी हिंदुस्थानी विमान पंपन्यांसाठी महिनाभरासाठी हवाई क्षेत्र बंद केले होते. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या नियमांनुसार ही बंदी महिनाभरच ठेवली जाऊ शकते. ही बंदी आता पाकिस्तानने आणखी महिनाभरासाठी वाढवली आहे. हिंदुस्थानी लष्कराचे हवाई हल्ले, दहशतवाद्यांचे उद्ध्वस्त करण्यात आलेले तळ यामुळे पाकिस्तानने अखेर शस्त्रसंधीची विनंती केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार करण्यात आला, मात्र हिंदुस्थानी लष्कराच्या धसक्याने पाकिस्तानने हवाई क्षेत्रावरील बंदी आणखी महिनाभरासाठी वाढवली आहे.

पाकिस्तानने यापूर्वी 1999 चे कारगिल युद्ध आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर आपले हवाई क्षेत्र हिंदुस्थानसाठी बंद ठेवले होते.

50 घुसखोरांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी रोखले

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान महिला जवानांशी लढण्यात सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानही आघाडीवर होत्या, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे डीआयजी एस. एस. मंड यांनी एएनआयला दिली. 8 मे रोजी पाकिस्तानातून हिंदुस्थानात घुसखोरी करणाऱया तब्बल 50 दहशतवाद्यांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी रोखले. त्यांच्या हालचाली दिसताच जवानांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यांचे बंकर्स उद्ध्वस्त केले आणि त्यांची फायर पॉवर कमपुवत करून टाकली. शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱया पाकिस्तानी सैन्याला बीएसएफने तोफगोळे डागून चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र

जागतिक आरोग्य संघटनेच्या मंचावरून हिंदुस्थानच्या प्रतिनिधी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तान आजही दहशतवादी पेंद्र बनवून जिहादी तयार करत आहे, असा आरोप केला. पाकिस्तान दहशतवादाला जन्म देतो आणि त्याचे पालनही करतो. त्यामुळे पाकिस्तान स्वतः दहशतवादपीडित असल्याचे ढोंग करू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या. पाकिस्तान डब्ल्यूएचओसारख्या जागतिक मंचाचा वापर खोटे आणि व्हिक्टीम कार्ड खेळण्यासाठी करतो, असा आरोपही त्यांनी केला.

पाकिस्तानी दुतावासातील आणखी एका अधिकाऱयाची हकालपट्टी

पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कार्यरत असलेल्या आणखी एका अधिकाऱयाची हिंदुस्थानातून हकालपट्टी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या अधिकाऱयाला पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले आहे. त्यानुसार या अधिकाऩयाला 24 तासाच्या आत हिंदुस्थान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन काम केल्याने त्याच्यावरकारवाई करण्यात आली.