मोदी, शहा आणि फडणवीसांमुळे मंत्री झालो, भुजबळांचा गौप्यस्फोट

माझा समावेश करून दुरुस्ती करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलेलेच होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले, असे सांगून या तिघांमुळेच आपण आता मंत्री झालो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला. मागच्या मंगळवारच्या बैठकीतच शपथ घ्यायची ठरले होते. मी कोणालाच सांगितले नव्हते, असेही भुजबळ म्हणाले.

मी नाशिकचा बालक

पालक कोण होईल याची काळजी का करता, असा सवाल करून ते म्हणाले, पालकमंत्री नसलो तरी कामे अडणार नाहीत. मी नाशिकचा बालक आहे. शिक्षण आणि राजकारण मुंबईत झालं असलं तरी नाशिक माझी जन्मभूमी आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.