अरेच्चा… अवघ्या 2 धावांवर संपूर्ण संघ गारद; एक धाव वाईडची

इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट लीगमधील नॉर्थ लंडन सीसी आणि रिचमंड सीसी मिडेक्स या संघांमधील सामना चांगलाच चर्चेत आला. नॉर्थ लंडन सीसी या संघानं तब्बल 424 धावांनी विजय मिळवला. कारण प्रत्युत्तरादाखल रिचमंड सीसी मिडेक्स संघ केवळ 2 धावांवर गारद झाला.

नॉर्थ लंडन डॉट कॉमनुसार नॉर्थ लंडन सीसी संघाकडून मिळालेल्या 425 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रिचमंड सीसी मिडेक्स संघ 5.4 षटकांत केवळ 2 धावांवरच गारद झाला. यातील 8 फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. विशेष म्हणजे या 2 धावांमध्ये एक धाव अवांतर (वाईड चेंडू) होती, तर एक धाव टॉम पिट्राइडिस याने केली.

नॉर्थ लंडन सीसीनं प्रथम फलंदाजी करताना 45 षटकांत 6 बाद 424 धावांचा डोंगर उभारला. यात सलामीवीर डॅनियल सिमन्सने 140 धावांची वादळी खेळी केली. संघातील इतर एकही फलंदाज अर्धशतकदेखील करू शकला नाही. तरीही या संघाने सवा चारशे धावांचे आव्हान उभे केले.