चंद्रपूरमध्ये वीज कोसळून एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

चंद्रपूर जिल्ह्यात दुपारपासून ढगाळ वातावरण होते, हलक्या हलक्या सरी देखील कोसळत होत्या. त्यातच दुपारी साडेतीनच्या सुमारास चंद्रपूर शहरालगत असलेल्या मारडा गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मारडा गावाजवळ पांदण रस्त्याचे काम सुरू असताना अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी काम करणारे आनंदराव वायरे आणि त्यांचे तीन सहकारी जवळच उभ्या असलेल्या बंद ट्रॅक्टरखाली आश्रयासाठी थांबले. तेव्हाच ट्रॅक्टरवर वीज कोसळली. या घटनेत आनंदराव वायरे यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे