दिल्लीत धुळीच्या वादळामुळे विमानाच्या हवेतच घिरटय़ा

छत्तीसगढवरून रायपूरमार्गे दिल्लीला जाणारे इंडिगो एअरलाईन्सचे विमान रविवारी टर्बुलेंसमध्ये अडकले. त्यामुळे दिल्ली विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वी विमानाला पुन्हा हवेत झेप घ्यावी लागली. राजधानी दिल्लीमध्ये धुळीच्या वादळामुळे विमान लँडिंगपुढे हे संकट उभे ठाकले होते. त्यानंतर विमानाला हवेत बराच वेळ घिरटय़ा घालाव्या लागल्या. नंतर एअर ट्राफिक कंट्रोलचा (एटीसी) सिग्नल मिळाल्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानाच्या घिरटय़ा मारण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.