
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वांद्रे आणि मालाड येथे घडली. या प्रकरणी मालवणी आणि निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
पहिली घटना वांद्रे येथे घडली. पीडित मुलगी ही वांद्रे परिसरात राहते. एकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक निर्माण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
दुसरी घटना मालाड परिसरात घडली. पीडित मुलगी मालाड परिसरात राहते. त्याच परिसरात एक जण राहतो. शनिवारी त्याने कामाचा बहाणा करून मुलीला घरी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.



























































