
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आमची चूक झाली, अशी जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पण या योजनेसाठी इतर विभागाच्या निधीची पळवापळवी मात्र थांबलेली नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकार डल्ला मारत आहे. आता या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6 हजार 765 कोटींचा निधीही महायुती सरकारने पळवला आहे.
काल म्हणाले, चूक झाली; आज श्रेय शिवराजसिंहांना; लाडकी बहीण योजना, अजित पवारांचे उल्टा पुल्टा
सरकारी तिजोरीत पैसे नसल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट आली आहे. दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यासाठी महायुतीची दमछाक होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6 हजार 765 कोटी रुपयांचा निधी वर्षभरात वळवला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी महायुतीने कुठल्या विभागाचा किती निधी कसा पळवला? ते पुढील प्रमाणे…
लाडकी बहीण योजना महायुतीच्या अंगलट, नीती आयोगाचे नियम डावलून दलित, आदिवासींच्या निधीवर सरकारचा डल्ला
> सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटी 30 लाखांचा निधी दोन वेळा, म्हणजेच सामाजिक न्याय विभागाचा 820 कोटी 60 लाखांचा निधी वळवला
> आदिवासी विभागाचा आतापर्यंत 1 हजार 7 कोटी रुपयांचा निधी वळवला.
> दोन्ही विभागांचा मिळून आतापर्यंत 1827 कोटींचा निधी वळवला.
> वर्षभरात तब्बल 6 हजार 765 कोटी रुपयांचा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणार
> मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 1320 कोटी तर घरकुल योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्राम विकास ) 1485 कोटीही वळवणार