मॅनेजरने ग्राहकांच्या खात्यातून काढले  4.58 कोटी रुपये

आपले पैसे ठेवण्यासाठी बँक ही सर्वात सुरक्षित जागा समजली जाते. या विश्वासाला तडा देणारी घटना कोटा येथे घडली. आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशीप मॅनेजर असलेल्या महिलेने 110 ग्राहकांच्या खात्यातून तब्बल 4.58 कोटी रुपये काढले. तिने हे पैसे शेअर बाजारात गुंतवले. त्यात तिला मोठे नुकसान झाले. एक ग्राहक एफडीची माहिती घेण्यासाठी बँकेत पोचला तेव्हा ही फसवणूक उघड झाली.