तीन घुसखोर बांगलादेशी नागरिकांना कारावास, हद्दपार करण्याचे न्यायालयाचे निर्देश

मालाड पुर्वेकडे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या तीन घुसखोर बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. कारावास, दंड व तिघांनाही हिंदुस्थानातून हद्दपार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शिक्षा झालेल्या बांगलादेशी घुसखोर नागरिकांमध्ये एक पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. कुरार पोलिसांनी त्या तिघांना पकडले होते. त्यांना अटक करून 8 वे न्यायालयात हजर केले होते. ते घुसखोर असल्याचे सबळ पुरावे पोलिसांनी सादर केल्यानंतर न्यायालयाने याची दखल घेत तिघांनाही कारावास, दंड ठोठावत त्यांना हिंदुस्थानाबाहेर हद्दपार करण्याचे निर्देश दिले आहेत.