
पूर्वीच्या वादातून एकाच कुटुंबातील चौघांवर तलवार, चाकू आणि काठ्यांनी हल्ला केल्याची घटना माटुंगा येथे घडली आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा नोंद केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. माटुंगा येथे एक महिला राहते. त्या परिसरातच हल्लेखोर राहतात. गेल्या महिन्यात दोघांनी महिलेच्या आई आणि त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. माटुंगा पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा नोंद केला होता. त्याचा राग डोक्यात एकाने ठेवला.