मार्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध महिलेची पर्स चोरणारा अटकेत

मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध महिलेला जखमी करून तिची पर्स चोरणाऱ्या चोरट्याला अखेर चारकोप पोलिसांनी अटक केली. अल्ताफ मोहम्मद उमर खान असे त्याचे नाव आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 150 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या कांदिवली येथे राहतात. गेल्या महिन्यात त्या पहाटे मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. महावीर नगर येथून जात असताना सुसाट वेगातील मोटरसायकलवरून दोन जण आले.

मोटरसायकलच्या मागे बसलेल्या एकाने महिलेची पर्स हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने पर्स घट्ट धरून ठेवली. त्या झटापटीत आरोपी आणि महिला हे दोघे खाली पडले. त्याने महिलेला काही अंतर ओढून नेले. महिलेने पर्स सोडली नाही. त्या पर्समध्ये काही पैसे व कागदपत्रे होती. चोरट्याने महिलेवर हल्ला करून तिची पर्स चोरून पळ काढला. त्यात महिलेच्या डोक्याला दुखापत झाली.