दुचाकी व सोनसाखळी चोरणारे जेरबंद

दुचाकी चोरणाऱया तिकडीला पंतनगर पोलिसांनी जेरबंद केले. त्या आरोपींनी मुलुंड येथे सोनसाखळी चोरीचा गुन्हादेखील केल्याचे उघडकीस आले आहे. घाटकोपर पूर्वेकडे राहणाऱया यश महाजन (23) या तरुणाची पल्सर दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. तेव्हा मिळालेल्या माहितीच्या आधारे रेकॉर्डवरचा आरोपी प्रेशित नार्वेकर याच्या चौकशीतून सतपाल आणि हरजीत हे दोघे वाहन चोरी करणारे असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी त्या दोघांवर लक्ष केंद्रीत केले. दोघेही मुंबईत आल्याचे कळताच त्यांना पकडण्यात आले. या तिन्ही आरोपींनी मुलुंड येथे सोनसाखळी चोरण्याचा गुन्हा केला होता.